पुणे / नगर सह्याद्री शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजक घटना उघडकीस आली आहे.पुण्यात सहा जणांनी १५ वर्षीय मुल...
पुणे / नगर सह्याद्री
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजक घटना उघडकीस आली आहे.पुण्यात सहा जणांनी १५ वर्षीय मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींनी अटक केली आहे.
जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. प्राप्त माहितीनुसार,आरोपी अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.आरोपी इतक्यावरच थांबला नाही.त्याने पीडितेचे नग्न फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींसोबतही पीडितेला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत,अत्याचार करत होते.याप्रकरणाची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली.कुटुंबीयांनी पीडितेला घेऊन तातडीने पोलीस ठाणे गाठले.याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, किरण जावळे, शुभम सुनील जाधव, आणि अनिल जाधव, अशी अटक करत आरोपींना अटक केली आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDelete