मुंबई।नगर सह्याद्री - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याच्या मागणीसाठी १७ डिसे...
मुंबई।नगर सह्याद्री -
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याच्या मागणीसाठी १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चाची हाक दिली आहे. हा रोष कमी करण्यासाठी कोश्यारींच्या उचलबांगडीच्या निर्णयास दिल्लीत शिक्कमोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार्या अधिवेशनापूर्वी हा निर्णय झाला नाही तर विरोधक विधिमंडळात याच विषयांवर सरकारला अडचणीत आणण्याची दाट शयता आहे.
महाराष्ट्रातील काही खासदारांनी अमित शहा यांची भेट घेत राज्यपाल हटावची मागणी केली. भाजपचे खासदार व शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालयाकडे तकार केली होती. मित्रपक्ष शिंदे सेनेच्या नेत्यांसह भाजपच्या काही नेत्यांनीही कोश्यारींच्या वक्तव्यावर नाराजी वर्तवली आहे. कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या भाषणाच्या संपूर्ण संदर्भातून एक छोटासा भाग काढून चुकीचा अर्थ लावला गेल्याचे सांगत राज्यपालांनी शहा यांना संपूर्ण वादावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या पत्रात त्यांनी कुठेही माफी मागितलेली नाही. ६ डिसेंबरला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, मुघल काळात शौर्य, त्याग व बलिदानाची उदाहरणे घालून देणार्या महाराणा प्रताप, श्री गुरुगोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची कल्पना स्वप्नातही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत.
COMMENTS