अकोला / नगर सह्याद्री पतीला ठार मारण्यासाठी पत्नीने ओळखीतील व्यक्तीला ३० हजार रुपयांचे आमीष दाखवून त्या व्यक्तीने गळफास देऊन पतीला ठार मारू...
अकोला / नगर सह्याद्री
पतीला ठार मारण्यासाठी पत्नीने ओळखीतील व्यक्तीला ३० हजार रुपयांचे आमीष दाखवून त्या व्यक्तीने गळफास देऊन पतीला ठार मारून नजीकच्या एका जीममध्ये गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे भासवले.
संशयावरून पोलिसांनी पत्नी आणि सुपारी किलरला पोलिसी खाया दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना दहिहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुंडा येथे गुरुवारी उघडकीस आली. जीममध्ये लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत सचिन बांगर (वय- ३५) यांचा मृतदेह २८ डिसेंबरला आढळला.
पोलिसांना मृताच्या पायावर व गळ्यावर गळफासाचे दोन व्रण असल्याचे दिसल्याने खुनाचा गुन्हा दाखल करत पत्नी कंचन व सचिनच्या घरी येणेजाणे असलेला डिगांबर प्रभाकर माळवे (४५) यालाही ताब्यात घेतले. पतीच्या त्रासाला कंटाळून त्याला गळफास दिल्याची कबुली त्यांनी दिली. डिगांबर माळवेला ३० हजार रुपयांचे आमिष दाखविले. माळवे याने मृताच्या घरी रात्री सचिनचा गळा दाबून खून केला.
COMMENTS