ग्रामसभेत पदाधिकार्यांचे आवाहन निघोज | नगर सह्याद्री निघोज व परिसरात ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून केंद्र सरक...
ग्रामसभेत पदाधिकार्यांचे आवाहन
निघोज | नगर सह्याद्री
निघोज व परिसरात ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या विकासकामांना पाठबळ मिळत असून स्थानिक विकासकामे करण्यासाठी निधीची अपुर्णता आहे. यासाठी जनतेने घरपट्टी, पाणीपट्टी तसेच ग्रामपंचायत गाळ्यांची भाडे भरल्यास विकासकामांना गती मिळेल अशी मागणी पदाधिकार्यांनी गुरुवार दि.२९ रोजी झालेल्या ग्रामसभेत केली आहे.
उपसरपंच माऊली वरखडे या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. या ग्रामसभेसाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील वराळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश वाव्हळ, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील वरखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, दत्तात्रय घोगरे, ठकाराम वरखडे, संदीप वरखडे,भास्कर वरखडे, विलासराव हारदे, मनोहर राउत, दत्तात्रय राउत, मंळगंगा पतसस्थेचे संचालक राजेंद्र लाळगे, भागा ढवण, श्रीकांत पवार, बाबाजी वाघमारे, रामराव वरखडे, रुपेश ढवण, गोपाळ वराळ आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांनी लोकसहभाग तसेच ईतर निधी यातून होत असलेल्या कामांची माहिती दिली.तसेच घनकचरा प्रकल्प यासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून काम सुरू झाले आहे. मात्र या कामाची माहिती संबंधित ठेकेदाराने ग्रामसभेत देउन काम कसे पुर्ण करणार याची सविस्तर माहिती देणे गरजेचे असल्याचे वाळके यांनी सांगितले. उपसरपंच माऊली वरखडे यांनी सध्या ग्रामपंचायत गाळे ज्यांच्याकडे आहेत. त्यांनी गाळ्यांचे भाडे त्वरित न भरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच ग्रामपंचायत जागेमधील ईमारतीत पोलिस दुरक्षेत्र असून त्यांनी आजपर्यंत ७६ हजार रुपये भाडे थकवले असून त्यांनी हे भाडे लगेच भरण्याची सुचना केली.
गरजूंना प्रत्येक महिन्याला धान्य मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे आवाहन उपसरपंच माऊली वरखडे यांनी यावेळी केले आहे.
COMMENTS