विश्वनाथ कोरडेंसह शेतकर्यांचे अभियंतेत्याकडे दुरुस्तीसाठी मागणी पारनेर । नगर सह्याद्री कुकडी डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती...
विश्वनाथ कोरडेंसह शेतकर्यांचे अभियंतेत्याकडे दुरुस्तीसाठी मागणी
पारनेर । नगर सह्याद्री
कुकडी डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याने शेकडो एकर जमीन क्षारयुक्त झाली आहे.आवर्तन काळात पाणी गळतीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून हा तातडीने दुरुस्ती करावा अशी मागणी भाजपा कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या सह शेतकर्यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी केली आहे.
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास भेट देऊन कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांना जवळे येथील किमी 56.900 ते 57.900 कुकडी डावा कालवा गळती बाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नवनाथ सालके (उपाध्यक्ष पारनेर तालुका भाजपा) अशोक सालके (सदस्य ग्रा. प.जवळे) रवि सालके पा.(सामाजिक कार्यकर्ते)आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवेदनामध्ये पारनेर तालुक्यातील हद्दीतील प्रशांत कडूसकर यांना विश्वनाथ दादा कोरडे यांनी जवळे कुकडी डावा कालवा किमी 56.900 ते 57.900 मधील सर्व शेतकर्यांचे सर्वसाधारण शंभर हेक्टर क्षेत्र पूर्ण क्षारपड होऊन कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही. तरी कालवा दुरुस्त करून प्लॅस्टर केल्यास आमचे होणारे नुकसान कमी होऊन, शेती करण्यास योग्य होईल. आमचे कार्यक्षेत्रामध्ये कालव्यास पाणी सुटल्यानंतर पाण्याची फार मोठ्या प्रमाणात गळती होते व पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कृपया सदर अर्जाचा विचार करून कुकडी डावा कालवा गळती त्वरित बंद करावी व आमचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
COMMENTS