क्रेडाई अहमदनगरच्या नूतन स्वमालकीच्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन अहमदनगर | नगर सह्याद्री आधुनिक काळात सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ...
क्रेडाई अहमदनगरच्या नूतन स्वमालकीच्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
अहमदनगर | नगर सह्याद्री
आधुनिक काळात सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. व्यावसायिकांनी हे बदल अंगिकारले पाहिजे. बांधकाम क्षेत्रातही तंत्रज्ञान खुपच प्रगत झाले आहे. याशिवाय सरकार वेळोवेळी कायदे करून या क्षेत्राला पूरक निर्णय घेत आहे. अशा वेळी बांधकाम व्यावसायिकांनीही नवीन बदल आत्मसात करावे आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा दिली पाहिजे. क्रेडाई ही देशपातळीवरील प्रतिष्ठीत व विश्वासार्ह संघटना आहे. अहमदनगर क्रेडाईने स्वमालकीचे स्वतंत्र कार्यालय सुरू करून कौतुकास्पद काम केले आहे. नव्या कार्यालयात विविध चर्चासत्र, तज्ज्ञांची व्याख्याने घेऊन सदस्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल यासाठी प्रयत्न करावेत , असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे चेअरमन सतीश मगर यांनी केले.
क्रेडाई अहमदनगरच्या पाईपलाईन रोडवरील नूतन स्वमालकीच्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन मगर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रेडाई नॅशनलचे व्हाईस प्रेसिडेंट शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, सीआरएम अध्यक्ष सुनील फुर्दे, प्रमोद खैरनार, सेक्रेटरी सुनील कोतवाल, सहसेक्रेटरी संजय गुगळे, क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सेक्रेटरी अमित वाघमारे, उपाध्यक्ष गिरीश अग्रवाल, सागर गांधी, खजिनदार प्रसाद आंधळे, सहसेक्रेटरी संजोग गुगळे, सहखजिनदार प्रकाश मेहता, संचालक ड. जयवंत भापकर, दीपक बांगर, युथ विंगचे शिवांग मेहता, मयुर राहिंज, वुमेन्स विंगच्या सोनाली मुथा, नितीन गुगळे, आशिष पोखरणा, जवाहर मुथा, हेमकृष्ण इंगळे, अमित फिरोदिया, अशोक पितळे, मोहनलाल मानधना, मकरंद कुलकर्णी, राजेंद्र पाचे, रवींद्र मुळे, आदी सभासद उपस्थित होते.
प्रास्ताविकात क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा यांनी सांगितले की, अहमदनगर शहरात क्रेडाईचे सदस्य सर्व शासकीय नियमानुसार काम करत ग्राहकांना उत्तम सेवा देत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर क्रेडाई प्रॉपर्टी एस्पो भरवला होता. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आता क्रेडाईचे सुसज्ज असे स्वमालकीचे कार्यालय सुरू झाले आहे. याठिकाणी नियमित बैठका घेतल्या जातील तसेच विविध कार्यक्रम आणि सेमिनारही आयोजित करण्याचे नियोजन आहे. यावेळी शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, सुनील फुर्डे, प्रमोद खैरनार, सुनील कोतवाल, संजय गुगळे आदींनी मनोगते व्यक्त करून क्रेडाई अहमदनगरच्या सभासदांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी अमित वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास क्रेडाई अहमदनगरचे सर्व सभासद उपस्थित होते.
COMMENTS