अहमदनगर । नगर सह्याद्री बंगाल चौकी परिसरात हातात तलवार घेऊन रोडवर दहशत निर्माण करणार्या इसमास पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्या...
अहमदनगर । नगर सह्याद्री
बंगाल चौकी परिसरात हातात तलवार घेऊन रोडवर दहशत निर्माण करणार्या इसमास पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुजय विल्यम हिवाळे यांच्या फिर्यादीवरुन जॉन कासिनो परेरा (वय34, रा. बंगाल चौकी, ता.जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
30 डिसेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास मनोज कचरे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ अमोल गाढे, पोकॉ संदीप थोरात, पोना योगेश खामकर असे पोलिस स्टेशन येथे असतांना गुप्त बातमीदारामार्फत पेलिस निरिक्षक संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली की नगर शहरातील बंगाल चौकी येथे एक इसम हातात तलवार घेऊन रस्त्यावर दहशत निर्माण करत आहे. त्यानुसार पोलिस निरिक्षक शिंदे यांच्या सुचनेनुसार पथकाने छापा टाकून बंगाल चौकी परिसरात दहशत निर्माण करणार्या जॉन कासिनो करेरा यास ताब्यात घेतले.
अंगझडती व तलवार कोठून आणली अशी विचारपूस केली असता लोकांकडून धोका असल्यामुळेे तलवार सोबत घेऊन फिरत असल्याचे सांगितलेे. पोलिसांनी 3500 रुपये किमतीची तलवार जप्त केली असून परेरा विरुद्ध भादवी कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई कचरे करीत आहेत.
COMMENTS