मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’ निधी अपहार प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच...
मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’ निधी अपहार प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पिता-पुत्रांना लीन चिट दिली आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. हायकोर्टाने या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील यांना अटकेपासून कायमस्वरूपी दिलासा दिला होता. १९७१ च्या युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणार्या ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेवर युद्धस्मारक बनवण्याच्या नावाखाली जमा केलेल्या ५८ कोटींच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार असताना केली होती.
COMMENTS