अहमदनगर | नगर सह्याद्री तरूणीस वेश्या व्यवसायामध्ये अडकविणार्या पसार तरूणाला तीन वर्षांनंतर अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. गिरीष ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
तरूणीस वेश्या व्यवसायामध्ये अडकविणार्या पसार तरूणाला तीन वर्षांनंतर अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. गिरीष रवींद्र थोरात (वय ३४ रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात १० एप्रिल २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तेंव्हापासून तो पसार होता.
मुंबई येथील पीडित तरूणीला जास्त पगाराचे घरगुती काम मिळून देतो, असे सांगून नगरमध्ये बोलून घेतले. तरूणी बोल्हेगाव येथे आल्यानंतर तीला वेश्या व्यवसाय करण्यास सांगितले. तरूणीने नकार दिला असता तिला २ एप्रिल, २०१९ ते ९ एप्रिल, २०१९ दरम्यान मारहाण करण्यात आली. तरूणीने सुटका करून घेत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादीवरून गिरीष थोरात व पल्लवी ऊर्फ शारदा राजेंद्र मांगडे (रा. बोल्हेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. शारदा मांगडे हिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. गिरीष थोरात पसार होता.
गिरीष पत्रकार चौकात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, वसिम शेख, सुरज वाबळे, सतिष त्रिभुवन यांच्या पथकाने गिरीष थोरातला अटक केली.
COMMENTS