पारनेर । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथिल ऋतुजा ठुबे हिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ...
पारनेर । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथिल ऋतुजा ठुबे हिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
तिरुअनंतपुरम केरळ येथे 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2022 दरम्यान सुरू असलेल्या 65 वी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये 10 मीटर पीप साईट एअर रायफल या प्रकारात ऋतुजा बाबासाहेब ठुबे हिने उत्कृष्ट कामगिरी करत मे 2023 मध्ये होणार्या ऑल इंडिया कुमार सुरेंदर सिंग शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी तिची निवड झाली. सध्या ती तिच्या आईसोबत शिरूर मध्ये राहत आहे. विज्ञान शाखेमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षांत ती शिरूर येथिल सि.टी. बोरा महाविद्यालया मध्ये शिक्षण घेत आहे.
ऋतुजा हिची आई मजुरीचे काम करून तिला या खेळासाठी प्रोत्साहित करत असते.शिरूर मधीलच युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब मध्ये ती प्रशिक्षक शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ठाणे शहर पोलिस उपायुक्त गणेश गावडे, पारनेरचे आमदार निलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, नगरसेवक नितिन पाचर्णे, शिवसेना शिरूर आंबेगाव तालुका प्रमुख गणेश जामदार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन बढे, भाजपा पारनेर तालुका उपाध्यक्ष काशिनाथ नवले, बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड, उपसरपंच ड. ईश्वर दिवटे पाटिल, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी ऋतुजा ठुबे हिचे अभिनंदन केले व आगामी होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS