बंगळुरू । नगर सह्याद्री - कर्नाटकातील गदग जिल्ह्यात एका शिक्षकाने इयत्ता चौथीच्या दहा वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर शाळ...
कर्नाटकातील गदग जिल्ह्यात एका शिक्षकाने इयत्ता चौथीच्या दहा वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून ढकलून दिले. यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षक फरार आहे. वरिष्ठ एसपी शिवप्रकाश देवराजू म्हणाले, हे प्रकरण हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. आरोपी कंत्राटी शिक्षक मुथप्पा असून भरत असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.आरोपी शिक्षकाने भरतच्या आईलाही मारहाण केली होती, जी शाळेत शिक्षिका आहे. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
COMMENTS