भूपेंद्र पटेल यांनी आज दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भूपेंद्र पटेल यांच्यासह १६ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
भूपेंद्र पटेल यांनी आज दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भूपेंद्र पटेल यांच्यासह १६ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
जाणून घेऊया भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री झाले?
०१. कनुभाई देसाई
०२. हृषिकेश पटेल
०३. राघवजी पटेल
०४. बलवंत सिंग राजपूत
०५. भानुबेन बाबरिया
०६. कुंवरजी बावळ्या
०७. अय्यर मुलुभाई बेरा
०८. कुबेर दिंडोर
०९. हर्ष संघवी
१०. जगदीश पांचाळ
११. बच्चू खबर
१२. परुषोत्तम सोळंकी
१३. मुकेशभाई पटेल
१४. प्रफुल्ल पानसेरिया
१५. भिखू सिंग जी परमार
१६. कुंवरजी हलपती
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने नवा विक्रम केला आहे. विधानसभेच्या १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजपचे १५६ उमेदवार विजयी झाले. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. काँग्रेस ७७ जागांवरून थेट १७ वर खाली आली. म्हणजे काँग्रेसला ६० जागांचे नुकसान सहन करावे लागले. यावेळी सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या केवळ पाच उमेदवारांनाच निवडणूक जिंकता आली. राज्यात तीन जागा अपक्ष उमेदवारांना गेल्या, तर समाजवादी पक्षाने (एसपी) एक जागा जिंकली.
१९६० मध्ये राज्याच्या स्थापनेनंतर गुजरातमधील सलग सातव्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा हा सर्वात मोठा विजय आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही इतिहास रचला. त्यांनी घाटलोडिया मतदारसंघात सुमारे १,९२,००० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला.२०१७ च्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या, काँग्रेसला ७७ जागा सोडल्या होत्या आणि एनसिपी, बीटीपी आणि अपक्षांना अनुक्रमे 1, 2 आणि 3 जागा मिळाल्या होत्या.
COMMENTS