नाशिक / नगर सहयाद्री बेंगलोरमध्ये जेवढे कन्नड भाषिक नाहीत आज अहमदाबादमध्ये जेवढे गुजराती नाहीत, तेवढे मुंबईत आहेत.तेवढे मुंबईत आहेत.पाटणामध...
नाशिक / नगर सहयाद्री
बेंगलोरमध्ये जेवढे कन्नड भाषिक नाहीत आज अहमदाबादमध्ये जेवढे गुजराती नाहीत, तेवढे मुंबईत आहेत.तेवढे मुंबईत आहेत.पाटणामध्ये जेवढे हिंदी भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. मग तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी त्या त्या भागाचा विकास केला पाहिजे, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे नाव न घेता केली आहे.
आजच्य घडीला अहमदाबादमध्ये जेवढे गुजराती नाहीत,तेवढे मुंबईत वास्तव्य करतात. बेंगलोरमध्ये जेवढे कन्नड भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. पाटणामध्ये जेवढे हिंदी भाषिक नाहीत,तेवढे मुंबईत आहेत. मग तिकडचाही विकास केला पाहिजे, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मी बेळगाव, कारवारला गेलो, त्यावेळी सहा सात लोकांचे बळी गेले. तो प्रसंग आजही आठवल्यावर अंगावर सहारे येतात. मात्र सध्याचे जे राजकारण सुरूय, त्यावरून असे दिसते कि, कर्नाटक सरकारच्या चोराच्या उलट्या बोंबा मारत आहे. बेळगाव, कारवार राहिलं बाजूला आणि जत, अक्कलकोट मागायला लागले आहेत. इकडे महाराष्ट्र राज्यातले प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत, यामुळे राज्यातील तरुणांचा रोजगार बुडत आहे, राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. याकडे लक्ष सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे.
राज्यभरात वातावरण तापले असून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादानंतर आंदोलने करण्यात येत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यातील भिक मागणं हा शब्द फुले, आंबेडकर अनुयायांना लागला. मात्र फुले, आंबेडकरांनी भीक नाही मागितली. महात्मा फुले कॉन्ट्रॅक्टर होते, यांनी त्याकाळी अनेक मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या. स्वाभिमानातून या शाळा उभ्या राहिल्या. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितल्यानंतर पुढे आंदोलनाची गरज नसल्याचे ते म्हणाले
COMMENTS