अहमदनगर | नगर सह्याद्री तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक संकटांवर मात करत देशाला प्रगतीकडे नेले. बहुपक्षीय सरकार त्यांनी उत्...
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक संकटांवर मात करत देशाला प्रगतीकडे नेले. बहुपक्षीय सरकार त्यांनी उत्कृष्टपणे चालवत देशात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या विचारावरच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आदर्शवत काम करत आहेत. देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव केला गेला आहे. नगर शहरात जुन्या भाजपाच्या अनेक पदाधिकार्यांच्या घरी स्व.अटलबिहारी वाजपेयी आल्याच्या आठवणी आजही स्मरणात आहेत. अशा महान राजनेत्याच्या जयंती निमित्त त्यांनी दाखवलेल्या देशहिताच्या मार्गावर आपण सर्वजण मार्गस्थ होवू, असे प्रतिपादन शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
शहर भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रमिमेस जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर व शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रमही उपस्थित सर्वांनी रेडीओवर ऐकला. यावेळी ज्येष्ठनेते सुनील रामदासी, संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, उपाध्यक्ष संतोष गांधी, मंडल अध्यक्ष पंकज जहागीरदार व अजय चीतळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर यांनी नाशिक पदवीधर मतदार संघाच्या होणार्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा आढावा घेतला. ते म्हणाले, नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अद्याप मतदार नोदणी चालू आहे. नगर जिल्ह्यात समाधानकारक मतदार नोंदणी झाली असून जिल्ह्याचे ठिकाण म्हणून नगर शहरातून अजून जास्त प्रमाणात नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करावे.
यावेळी किशोर बोरा, बाबासाहेब सानप, शशांक कुलकर्णी, राजू मंगलारप, महावीर कांकरिया, लक्ष्मिकांत तिवारी, मिलिंद भालसिंग, वैभव ढाकणे, संजय ढोणे, कालिंदी केसकर, नगरसेविका पल्लवी जाधव, रेखा विधाते, छाया राजपूत, पोपट रोकडो, संतोष रेखी, अभिषेक वराळे, सिद्धेश नाकाडे, विजय शिंदे, संदेश रपारीया, चंद्रकांत पाटोळे, नितीन सोनावणे, अनिल सबलोक, सुमित खरमाळे, मल्हार गंधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS