नागपूर / नगर सहयाद्री महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून ‘बॉम्ब’वॉर सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
नागपूर / नगर सहयाद्री
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून ‘बॉम्ब’वॉर सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडीवर टीका करताना ‘बॉम्ब’चा उल्लेख केला आहे.शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कराव जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे.महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला.त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
अविश्वास ठराव आणायचाच होता तर तो अधिवेशाच्या पहिल्या दिवशीच आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बॉम्ब आहे, असं बावनकुळे म्हणालेत.विरोधकांचे वीस पंचवीस आमदार पुन्हा येणार आहे.१८४ च्या वरती मतदान मिळतील.सगळे विरोधक हे विधानभवनात राजकीय बोलले.जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं बावनकुळे म्हणालेत.अखंड महाराष्ट्राच्या विकास कसा होईल.
राष्ट्रवादीची वेगळी भूमिका, उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसतात.विदर्भ आणि महाराष्ट्र विकासाबाबत काहीच बोलले नाही.महाराष्ट्र जनता भावनिक तुमचे शब्द ऐकणार नाही. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, सरकारच्या वतीने जनतेसाठी काय करता येईल. विदर्भासाठी काय करता येईल. मराठवाड्यासाठी काय केलं पाहिजे. यावर चर्चा अपेक्षित होती. तसं झालं नाही. विरोधक दुतर्फी भूमिका घेत आहेत,असंही बावनकुळे म्हणालेत.
COMMENTS