औरंगाबाद / नगर सह्याद्री : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालेलं आहे.त्यातच राज्य परि...
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालेलं आहे.त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर शहराचे नाव बदलले आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अतिघाई ,वाद उभा राहण्याची शक्यता...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा समोर आला आहे. शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगरचा उल्लेख करण्यात आला आहे.शहराच्या नावात बदल होण्याआधीच महामंडळाने शहराचं नाव बदललं आहे. शिवशाहीच्या डिजिटल बोर्डवर
औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगरचे बोर्ड झळकले आहे. दरम्यान, शिवशाही बसेसच्या डिजिटल बोर्ड मध्ये बदल करण्यात आला आहे.आक्षेप घेतलेला असल्याने त्यावर वाद कायम आहे. राजकीय नेत्यांमध्ये त्यावरून आजही आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच आता राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसेसच्या बोर्डवर छत्रपती संभाजीनगर नावं झळकले आहे.शहराच्या नामांतरावरुन पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालेलं आहे .खरंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतरावर निर्णय झाला असला तरी त्यावरून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आक्षेप घेतलेला त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर शहराचे नाव बदलले आहे. त्यावर आजही विरोध केला जातो आहे. औरंगाबाद हेच नावं असू द्यावे असा एक गट आहे तर दूसरा गट छत्रपती संभाजीनगर असे नाव नामांतर करावे अशी मागणी करत आहे.
COMMENTS