श्री संताजी महाराज जनागडे कोनशीलेचे अनावरण अहमदनगर | नगर सह्याद्री राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांची अभंग व गाथा ...
श्री संताजी महाराज जनागडे कोनशीलेचे अनावरण
राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांची अभंग व गाथा तंतोतंत लिहून समाजासाठी अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे. कापड बाजारात चौकाला राष्ट्रसंत संताजी महाराज यांचे नाव दिले. ही समाजासाठी गौरवास्पद बाब आहे. संत हे कोण्या एका समाजाचे नसून संपूर्ण मानवजातीचे असतात. संतांमध्ये जात-पात हा भेदभाव कधीच नसतो. आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांनी प्रवचनातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संताजी महाराज जगनाडे यांचे अभंग व गाथा सांगितल्या आहेत. सर्व संतांची शिकवण एकच आहे. संताजी महाराजांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीसाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जैन कॉन्फरन्सचे प्रमुख मार्गदर्शक बाबुशेठ बोरा यांनी केले आहे.
कापड बाजार तेली खुंट चौक येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज जनपथ या कोणशीलेचे अनावरण जैन कॉन्फरन्स चे प्रमुख मार्गदर्शक बाबुशेठ बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक मोहन मानधना, माजी नगरसेवक संजय चोपडा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, अशोक जोशी, हभप क्षीरसागर महाराज, अजय ढोणे, प्रांत संघाचालक नानासाहेब जाधव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, संजय ढोणे, ए.के.गुगळे, माजी नगरसेवक अजय साळवे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, शिर्डी येथील अँड.विक्रांत वाकचौरे, सचिन लोखंडे, बद्रीनाथ लोखंडे, सुधाकर काका बनसोडे, देविदास साळुंके, श्रीराम हजारे, विलासराव काळे, गणेश हजारे, सचिन म्हस्के, युवा आघाडीचे अध्यक्ष गणेश धारक, प्रमोद वाळके, जब्बारभाई शेख, गणेश पलंगे, गणेश म्हस्के, परसराम सैंदर, सचिन बर्डे, माजी नगरसेविका सिंधुताई शिंदे, संताजी नागरी पतसंस्थेचे चेअरमन मीरा डोळसे, सरलाताई शिंदे आदी उपस्थित होते. संजय चोपडा म्हणाले,हरिभाऊ डोळसे यांना सामाजिक कार्याची पूर्वीपासूनच आवड आहे.संताजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतल्याने संताजी महाराजांचे कार्य लोकांना परिचित झाले आहे. प्रा. विधाते म्हणाले, ज्या व्यक्तींच्या नावाने समाज ओळखला जातो. अशा संत श्री संताजी महाराज जगनाडे यांचे नाव या चौकाला दिले आहे. ही समाजासाठी भुषणावह बाब आहे.सुहासभाई मुळे म्हणाले,संताजी महाराज या थोर संतांनी न संपणार्या अमृताचा ठेवा आपल्याला दिला आहे. हरिभाऊ डोळसे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे महापुरुषांचे विचार समाजाला कळतात. हभप क्षीरसागर महाराज म्हणाले,संतांनी हिंदू संस्कृती परंपरेचे जतन केले आहे. अभंग व गातेचा थोर वारसा संताजी महाराजांनी आपल्या पिढी पुढे ठेवला आहे.
COMMENTS