भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडीत श्री अय्यप्पा मंदिरात चालू असेलेल्या ६० दिवसांच्या मंडल, मकर पूजा उत्सवात ...
भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
अहमदनगर | नगर सह्याद्रीसावेडीत श्री अय्यप्पा मंदिरात चालू असेलेल्या ६० दिवसांच्या मंडल, मकर पूजा उत्सवात ४१ व्या दिवशी मंडलपूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. श्री अय्यप्पा स्वामीना मानणारा मोठा वर्ग नगरमध्ये आहे.उद्योजक के के शेट्टी व विनया शेट्टी हे दाम्पत्य नगर मध्ये गेली ३८वर्षापासून मंडला महापूजा उत्सव करतात. शेट्टी हे नगरमध्ये राहण्यास आल्यावर पहिले १० वर्ष त्यांनी घरी हा उत्सव साजरा केला नंतर सावेडी येथे अय्यप्पा मंदिरासाठी जागा घेवून भाविकानि मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून येथे हा ४१ वा दिवसाचा मंडल महापूजा उत्सव शेट्टी कुटूंबीय व अय्यप्पा सेवा समितीच्यावतीने साजरा करण्यात आला.
गेली २ वर्षे कोविडमुळे होणारे कार्यक्रम झाले नव्हते. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. केरळमधील शबरीमळाच्या मुख्य उत्सवाच्या धर्तीवर हा उत्सव नगरमध्ये केला जातो. उत्सावानिम्मित पहाटे महागणपती हवन झाले. दुपारी महिला व पुरुष भाविकांनी मंदिर परिसर फुलांनी सजविला. संध्याकाळी प्रोफेसर कॉलनीजवळील महालक्ष्मी मंदिर ते अय्यप्पा मंदिर शोभायात्रा (तालापोल्ली) काढण्यात आली. यामध्ये महिलांनी मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली ताट व त्यामध्ये अर्धा नारळात दिवा प्रज्वलित केला तर मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी उजळून निघाला होता. संध्याकाळी ८ वा दीपआराधना झाली. देवाची आरती नंतर पुष्पभिषेक करण्यात आला. याप्रसंगी मंदिरातील वातावरण प्रसन्न होते. नंतर महाप्रसाद संपन्न झाला. अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या या दोन महिन्याचा उत्सवात रोज पूजा व महाप्रसाद असतो. संक्रातीला मकर वीलक्कु उत्सवाने उत्सवाची सागता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष के के शेट्टी व अय्यप्पा सेवा सेमितीच्या पदाधिकारी केले आहे.
COMMENTS