मुंबई । नगर सह्याद्री - औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट...
मुंबई । नगर सह्याद्री -
औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब तरमळे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत नागे, आकाश नागे, अशोक नागे, पांडुरंग नागे, राजु बनकर,दिनेश राठोड, सुनिल खरात, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे.
बोकुड जळगाव येथे काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आहे. ज्यात भाऊसाहेब तळमळे यांच्या आईचा विजय झाला. याचच राग मनात ठेवून विरोधी गटातील अनिकेत नागे याने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर काल (३१ डिसेंबर २०२२) रात्री अचानक हल्ला केला आहे.
भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उचार सुरु आहे. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळतच बिडकीन पोलीस ठाण्यातील पथकाने गावात धाव घेतली. त्यानंतर जखमी तरमळे यांना रुग्णालयात हलवण्यात आले. गावात झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळेत पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली.
COMMENTS