नवी दिल्ली / वृत्तसंस्था - दिल्ली महापालिका निवडणुकीच्या आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची १५ वर्षाच...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था -
दिल्ली महापालिका निवडणुकीच्या आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आली आहे.
दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झालं एकूण १३४९ उमेदवार मैदानात होते.१५वर्षांपासून भाजपची सत्ता होती पण आम आदमी पक्षाला बहुमत सिद्ध करण्यात यश आलं आहे. दिल्ली महापालिकेच्या २५०पैकी२३३ 233 जागांचे निकाल ( दुपारी २ वाजेपर्यंत ) हाती आले आहेत.यात आम आदमी पक्षाला १२६ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप ९७ जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने ७ जागांवर विजय संपादन केला आहे. तर ३ अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.अजूनही १७ जागांचे निकाल येणं बाकी आहे.
दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन सुरु आहे.तर मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
COMMENTS