रविश रासकर यांचा आदर्श उपक्रम सुपा | नगर सह्याद्री अनाथ व मतिमंद मुलांच्या चेहर्यावर हसू फुलले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुक उ...
रविश रासकर यांचा आदर्श उपक्रम
अनाथ व मतिमंद मुलांच्या चेहर्यावर हसू फुलले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुक उपाध्यक्ष रविश रासकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत अनावश्यक खर्चांना फाटा देत गोरगरिब मतिमंद अनाथ मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
चास येथील मतिमंद शाळा व मतिमंद निवास विद्यालय या दोन्ही मतिमंद अनाथ या शाळांमध्ये आपला वाढदिवस साजरा करण्यात आला. सोशल मिडीयाच्या जमान्यात वाढदिवसाला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. वाढदिवस म्हटले की, मोठा डामडौल करण्यात येतो. अनाठायी खर्च करण्यात येतो. या सर्व खर्चाला फाटा देवून महाराष्ट् नवनिर्मान सेनेचे उपाध्यक्ष रविश रासकर यांनी अनाथ व मतिमंद मुलांना खाऊचे वाटप केले. व निरागस मुलांच्या चेहर्यावर हासू फुलले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांच्या सोबत अहमदनगर जिल्हा भ्रष्टचार विरोधी जन आक्रोश कार्याध्यक्ष योगेश कुलथे, अमोल दिवटे, रोहित रासकर, प्रवीण ठोकळ, उद्योजक मनोज गावखरे, ऋषिकेश गावखारे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
COMMENTS