अनंत आणि राधिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात राधिका दिसते.
मुंबई / नगर सह्याद्री -
रिलायन्सचे प्रमुख मुकेश आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी साखरपुडा झाला आहे. लवकरच दोघेही लग्न करणार आहेत. या जोडप्याच्या साखरपुडा समारंभातील फोटो समोर आले आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे असलेल्या श्रीनाथजी मंदिरात साखरपुड्याचा हा कार्यक्रम झाला. अनंत आणि राधिकाचे लग्न कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनंत आणि राधिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात राधिका दिसते. आता लवकरच ती अंबानी कुटुंबाची छोटी सून होणार आहे. अनंत आणि राधिका साखरपुडा झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विट करून दोघांचे अभिनंदन केले.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. या वर्षी जूनमध्ये, अंबानी कुटुंबाने त्यांची होणारी सून, राधिका मर्चंटसाठी अरंगेत्रम समारंभ आयोजित केला होता. बॉलिवूडचे प्रसिद्ध तारे तेथे पोहोचले होते. या कार्यक्रमातून राधिकाचे शास्त्रीय नृत्य करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यांचे लोकांनी खूप कौतुक केले.
राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाचे वडील वीरेन यांचीही गणना देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. राधिकाचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. यानंतर ती अभ्यासासाठी न्यूयॉर्कला गेली. तेथे तिने राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. २०१७ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, ती इसप्रवामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाली. तिला वाचन, ट्रॅकिंग आणि पोहण्याची आवड आहे.
COMMENTS