मुंबई / नगर सह्याद्री- आमिर खानने प्रॉडक्शन हाऊससाठी मुंबईमध्ये नवी जागा खरेदी केली आहे.डोक्यावर टोपी, कपाळी टिळा,पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर...
मुंबई / नगर सह्याद्री-
आमिर खानने प्रॉडक्शन हाऊससाठी मुंबईमध्ये नवी जागा खरेदी केली आहे.डोक्यावर टोपी, कपाळी टिळा,पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आमिर खानने केली पूजा, आरती करतानाचेही फोटो व्हायरल. डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी, कपाळावर टिळा, उपरणं, हातात कलश घेऊन आमिर पूजा करत आहे.शिवाय पूजा केल्यानंतर आमिर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आरतीही करताना दिसत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आमिरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा केली आहे.
अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता अपयशी ठरला.आता आमिरच्या नव्या व धमाकेदार चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशातच आमिरचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आमिरला नव्या लूकमध्ये ओळखणंही कठीण झालं आहे.पांढरे केस, दाढी,मिशीमध्ये आमिरचा लूक वेगळाच वाटत आहे.
स्वतःच्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.शिवाय पूजा केल्यानंतर आमिर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आरतीही करताना दिसत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आमिरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा केली आहे.
COMMENTS