नागपूर / नगर सहयाद्री राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विशेष म्हणजे सरकारी विमानाने मुंबईत येणार आहेत. मुख्यमंत...
नागपूर / नगर सहयाद्री
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विशेष म्हणजे सरकारी विमानाने मुंबईत येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच त्यांना हे विमान उपलब्ध करून देणार आहेत.खुद्द अजित पवार यांनीच ही माहिती दिली आहे.त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.विरोधक सत्ताधाऱ्यांच्या प्रेमातही पडल्याची टीका विरोधकांवर होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांसाठी सरकारी विमानाची व्यवस्था केली आहे.अजितदादांसोबत दिलीप वळसेपाटील मुंबईला जाणार आहेत. अजितदादांनी पत्रकारांशी संवाद साधताना तशी माहिती दिली आहे.
विद्यमान आमदार अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे. पण त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही.त्यामुळे जयंत पाटील यांना सांगलीतून मुंबईला जाण्यास सांगितलं आहे.मीही मुंबईला जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माझ्यासोबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीबाबत चर्चा केली.त्यावेळी मी उद्या नसेल परवा मिटिंग घ्या असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी कारण विचारलं.तेव्हा मुंबईला जायचं असल्याचं मी त्यांना सांगितलं.तेव्हा सकाळी १०वाजता बैठक घेऊ. त्यानंतर तुम्ही जा. तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी सरकारी विमान देतो असं मुख्यमंत्री म्हणाले.त्यानुसार मी माझ्या कार्यक्रमात बदल केला आहे. आज दुपारी १वाजता मी मुंबईला जाणार आहे.माझ्यासोबत दिलीप वळसे पाटील असतील, असं अजित पवार म्हणाले.
COMMENTS