नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांची माहिती अहमदनगर | नगर सह्याद्री येथील बालरंगभूमीला समर्पित आणि सतत...
नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांची माहिती
अहमदनगर | नगर सह्याद्री
येथील बालरंगभूमीला समर्पित आणि सतत २५ वर्ष बालकलाकारांना घडविणारी राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा म्हणजे कांकरिया करंडक होय. अगदी कोरोना काळात ही स्पर्धा ऑनलाईन घेऊन त्याची अखंडता जपली आणि यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. मानकन्हैय्या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया (निवृत्त न्यायाधीश) यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जात. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व स्पर्धेच्या स्वागताध्यक्षा नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
त्या म्हणाल्या, यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात राज्यभरातून २५ एकांकिकांनी प्रवेश घेतला आहे. या स्पर्धेत अंबाजोगाई, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, डोंबिवली, सोलापूर, अकोले, राहुरीसह अनेक जिल्हयातील बालकलाकार कला सादर करणार आहेत. यंदा ३०, ३१ डिसेंबर २०२२ तसेच १ जानेवारी २०२३ रोजी माऊली संकुल सभागृहात या स्पर्धा होतील. स्पर्धेचे उद्घाटन झी मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील परी ही भूमिका करणारी बालकलाकार मायरा वयकुल हिच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी असतील. कांकरिया करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण १ जानेवारी २०२३ रोजी सुप्रसिध्द चित्रपट अभिनेत्री व लेखिका डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकलाकार आरूष बेडेकर (योगयोगेश्वर जय शंकर मधील शंकर महाराज फेम कलाकार) उपस्थित राहणार आहेत.
यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असतांना कांकरिया करंडक संयोजन समितीच्या वतीने अहमदनगर शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी ज्यांनी नाटय-चित्रपट क्षेत्रात मौलिक योगदान दिले आहे, अशांच्या निवासस्थानी जाऊन यथायोग्य सत्कार करण्यात आला. त्यांना गौरव रंगभूमीचा’ हा सन्मान बहाल करण्यात आला. त्यामध्ये स्व. शाहू मोडक, मधुसुदन मुळे, श्रीकांत बेडेकर, अविनाश बेडेकर, डॉ. मुकुंद देवळालीकर, स्व. अॅड सतिष भोपे, स्व. अनिल तथा बालिकाका क्षीरसागर, स्व. सदाशिव अमरापूरकर, स्व. शाहू मोडक, मोहन सैद, आयुब खान, मकरंद खेर, सदानंद भणगे, पी. डी. कुलकर्णी, शांतिकुमार फिरोदिया मेमोरीयल फाऊंडेशन आणि पुढील टप्यात अहमदनगर जिल्हयातील नाटयसंस्था व नाटय कलाकारांचाही यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याचे कांकरिया दाम्पत्याने सांगितले. कांकरिया करंडकाच्या २५ वर्षांच्या आयोजनात कांकरिया करंडकाच्या स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश व कार्याध्यक्ष डॉ. वर्धमान कांकरिया, सचिव सदाशिव मोहिते, उमाकांत जांभळे, सुभाष बागुल, दत्ता इंगळे, मोईनुद्दिन ईनामदार, सौदागर मोहिते, प्रिया सोनटक्के, प्राची जांभळे, शशिकांत नजान, स्वप्निल मुनोत, नंदकुमार देशपांडे, गणपत लोखंडे, वर्षा लोखंडे, पुरूषोत्तम दरबस्तवार, वैशाली धांडे, स्मिरा कांकरिया, रामदास केदार, दिपक शिरसूल, प्रसाद बेडेकर, गौरव कुलकर्णी, डॉ. बागले सुभाष, मनोहर कटके, सिंधू कटके, रमेश बाफना, गौरी जोशी, डॉ. विजय जोशी, अश्विनी शेट्टी, अर्चना चौधरी, विजया मोहिते, उर्मिला जांभळे, सुरेश क्षीरसागर, रमेशचंद्र छाजेड, रत्नप्रभा छाजेड, सचिन तुपे, किरण कांकरिया यांचे योगदान असल्याचेही डॉ. कांकरिया यांनी सांगितले.
COMMENTS