अहमदनगर | नगर सह्याद्री पूर्वी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी तरूणीला बळजबरीने वाहनात बसवून घेऊन जात अत्याचार केल्याची घटना शनिवारी भिंगारमध...
अहमदनगर | नगर सह्याद्री
पूर्वी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी तरूणीला बळजबरीने वाहनात बसवून घेऊन जात अत्याचार केल्याची घटना शनिवारी भिंगारमध्ये घडली. यासंदर्भात पीडित तरूणीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षकासह सहा जणांविरूद्ध अत्याचारा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक विकास दौलतराव वाघ, त्याचा भाऊ संतोष दौलतराव वाघ, विकासची पत्नी आरती विकास वाघ, दोन मुली (सर्व रा. तपोवन रोड, समर्थ टॉवर, नाशिक) व नगर शहरात राहणारी एक महिला यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित शनिवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवर कोर्टाजवळून जात असताना तेथे थांबलेल्या आरोपींनी फिर्यादी तरूणीला बळजबरीने चारचाकी वाहनात बसविले. ‘तू आमच्या विरूद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घे’, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. काटवनात घेऊन जात आरोपी यांनी तू गुन्हे मागे घेण्यासाठी अॅफेडेव्हीट करून दे, असे म्हणून दोघांनी तरूणीला धरून विकास वाघ व संतोष वाघ यांनी बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.
काटवनात तरूणीवर पाच जणांकडून अत्याचार
तरूणीला वाहनातून घेऊन जात अत्याचार केल्याची घटना शनिवारी भिंगारमधील काटवनात घडली. यासंदर्भात नगर शहरातील एका उपनगरात राहणार्या पीडित तरूणीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.इम्रान शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मुकुंदनगर), शहानू शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बाराइमाम, कोठला), रिक्षा चालक अकरम ऊर्फ अरशद (रा. झेंडीगेट), बाशीद मुक्तार खान (रा. लिंक रोड, केडगाव) व केडगाव उपनगरात राहणारी एक महिला यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वरील पाच आरोपींनी पीडित फिर्यादी तरूणीला बळजबरीने रिक्षातून गोंविदपुराच्या पुढे काटवनात नेले. पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महिलेने पीडितेचे हात धरले व इतर आरोपींनी आळीपाळींनी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS