अहमदनगर । नगर सह्याद्री क्रिप्टोकंरन्सीमध्ये गुंतवणुक करण्याचा बहाणा करून शिर्डी येथे नियुक्तीस असलेल्या सीआयएसएफ कर्मचार्याची एकाने 11 ला...
अहमदनगर । नगर सह्याद्री
क्रिप्टोकंरन्सीमध्ये गुंतवणुक करण्याचा बहाणा करून शिर्डी येथे नियुक्तीस असलेल्या सीआयएसएफ कर्मचार्याची एकाने 11 लाख 86 हजार 779 रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली. 16 एप्रिल 2022 ते 2 ऑगस्ट 2022 दरम्यान ही घटना घडली असून यासंदर्भात 5 डिसेंबरला येथील सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 419, 420 सह आयटी कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमंत कुमार बिमलप्रसाद यादव (वय 37 मुळ रा. ग्राम बरोथा, ता. संभूगंज, जि. बांका, राज्य बिहार, हल्ली रा. सीआयएसएफ क्वॉर्टर, शिर्डी ता. राहाता) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी यांची 16 एप्रिल 2022 रोजी राजेश सनातनी नामक टेलीग्राम धारक व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून राजेश सनातनी याने फिर्यादी यांना क्रिप्टोकंरन्सीमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखविले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून 16 एप्रिल ते 2 ऑगस्ट, 2022 दरम्यान वेळोवेळी एकुण 11 लाख 86 हजार 779 रूपये ऑनलाइन घेऊन फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.
COMMENTS