अहमदनगर । नगर सह्याद्री नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर रोडवरील हरीमळा येथे जेर...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर रोडवरील हरीमळा येथे जेरबंद केले. पप्पु ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरीमळा, सोलापुर रोड) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला 17 जानेवारीपासून दोन वर्षांकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
वाघमारे याने हद्दपार आदेशाचा भंग करून बेकायदेशिररित्या नगरमध्ये वास्तव्य करीत असताना आढळल्याने पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाघमारे हद्दपार असताना लपूनछपून घरी राहतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के, रणजित जाधव यांच्या पथकाला वाघमारे याला अटक करण्याच्या सूचना केल्या.
COMMENTS