अहमदनगर | नगर सह्याद्री विवाहितेचे पतीसोबत झालेले भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी करणार्याने गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घड...
विवाहितेचे पतीसोबत झालेले भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी करणार्याने गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली. २१ डिसेंबरला घडलेल्या या घटनेची फिर्याद २७ डिसेंबरला कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी कारभारी सातपुते (रा. उक्कडगाव ता. श्रीगोंदा) याच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पतीसोबत भांडण झाल्याने फिर्यादी नगर शहरात आई-वडिलांकडे राहत होत्या. तेथे येऊन तानाजी सातपुते याने आपण तुझे व तुझ्या नवर्याचे भांडण मिटवून घेवू, त्यासाठी आपल्याला शिक्रापूर (जि. पुणे) तालुयात राहत असलेल्या तुझ्या भायाकडे जावे लागेल’, असे म्हणाला.
फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्यासोबत गेल्या. तानाजीने फिर्यादीला त्यांच्या भायाकडे न नेता एका लॉजवर नेले. तेथे त्याने फिर्यादीच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS