अहमदनगर | नगर सह्याद्री जीवे ठार मारण्याची ५० हजारांची सुपारी देणारा व सुपारी घेणार्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्यां...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जीवे ठार मारण्याची ५० हजारांची सुपारी देणारा व सुपारी घेणार्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्यांमध्ये देवदरी रिसोर्टचा मालकाचा समावेश आहे.
रिसॉर्टचे मालक विठ्ठल तुकाराम वामन (वय ४१), नानासाहेब ऊर्फ नानाभाऊ बबन वामन (वय ४१, दोघे रा. देवगाव ता. नगर), वीर दीपक सोनवणे (वय ३५ रा. सर्जेपुरा), राहुल ऊर्फ बंडू उत्तम घोरपडे (वय ३१), कृष्णा ऊर्फ बच्चू सखाराम काते (वय ३०, दोघे रा. सिद्धार्थनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
देवदरी रिसोर्टचे मालक विठ्ठल तुकाराम वामन याने देवगावच्या सरपंचाचे पती संभाजी शिवाजी वामन (वय ४०) यांना रिसॉर्टचा कर भरण्याचे कारणावरून जिवे मारण्याची सुपारी दिली होती. १७ ऑगस्टला अनोळखी तिघांनी संभाजी वामन यांना अडवून लाकडी दांडयांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी संभाजी वामन यांच्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून पाच जणांना अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी, अंमलदार कैलास सोनार, राहुल द्वारके, रमेश दरेकर, अमोल आव्हाड, सुधाकर पाटोळे, महादेव निमसे, अविनाश कराळे, संजय काळे, भागचंद लगड, अरूण मोरे, होमगार्ड भागवत केदार, वैभव सुसे यांनी ही कामगिरी केली.
COMMENTS