पारनेर । नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लाभलेले बहुआयामी नेतृत्व असून त्यांनी राजकारण, समाजकारण, शे...
पारनेर । नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लाभलेले बहुआयामी नेतृत्व असून त्यांनी राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण आदि विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने राज्या बरोबर देशालाही प्रगतीपथावर नेले आहे. आपल्या ध्येय धोरणातून महिलांच्या सबलीकरण व विकासासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले असून शरद पवारांचे कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अळकुटीच्या ग्रामपंचायत सदस्य अर्चना पुंडे यांनी केले.
अळकुटी येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब पुंडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी आयोजित कार्यकमात पुंडे बोलत होत्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक उत्तम शिंदे, दिपाली राऊत, मिरा शिरोळे, योगिता काटे, आशा लाळगे, कांता फापाळे, संजय दुधाडे, लटांबळे मॅडम, अंगणवाडी सेविका रतन पुंडे, संगिता पुंडे, मदतनीस ज्योती बेलकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अर्चना पुंडे व संगिता पुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
COMMENTS