अहमदनगर । नगर सह्याद्री नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका हद्दीमध्ये तृतीयपंथीय नागरिकांना स्मशानभूमी / दफनभूम...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका हद्दीमध्ये तृतीयपंथीय नागरिकांना स्मशानभूमी / दफनभूमीसाठी जागा मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी परेश लोखंडे, तृतीयपंथीय संघटना अध्यक्ष काजलगुरू, लैला शेख, मस्तानी, मोगली, सना साधना, बिपाशा, अक्षदा, सागर, गौरी, शिवान्या, संध्या, रवीना, मीरा आदी तृतीयपंथीय नागरिक उपस्थित होते.
अहमदनगर शहरामध्ये 220 तृतीयपंथी नागरिक वास्तव्य करीत आहेत. तथापि अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये तृतीयपंथीय नागरिकांना स्मशानभूमी / दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे तृतीयपंथीय नागरिकांना त्यांच्या संस्कृती व परंपरेनुसार तृतीयपंथीय नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यास अडचण निर्माण होते.
अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये तृतीयपंथीय नागरिकांना स्मशानभूमीसाठी / दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा दिल्यास त्यांना त्यांचे संस्कृती व परंपरेनुसार तृतीयपंथीय नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तरी अहमदनगर शहरातील तृतीयपंथीय नागरिकांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये तृतीयपंथीय नागरिकांना स्मशानभूमी / दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा आयुक्त यांनी त्यांचे अधिकारात देण्यात यावी, अशी निवेदनात मागणी केली आहे.
COMMENTS