अहमदनगर । नगर सह्याद्री नगर तालुक्यातील वाळुंज येथील नालंदा स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशाचा इतिहास व भारतीय संस्कृत...
नगर तालुक्यातील वाळुंज येथील नालंदा स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशाचा इतिहास व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. नव्या पिढीला देशाचा इतिहास व संस्कृतीचे ज्ञान गरजेचे आहे. विद्यार्थ्यांत देशाभिमान व प्रेम वाढविण्याचा प्रयत्न नालंदा स्कूलने स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून केला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी इतिहास व संस्कृतीवर आधारित विविध नाट्य सादर केली.
प्राचीन भारतातील सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुगबाबत पारंपरिक वेशभूषेसह सादर केलेल्या नाटिका उपस्थितांचे आकर्षण ठरल्या. भारतीय संस्कृतीची माहिती देणार्या रामायण व महाभारत महाकाव्यांच्या संकल्पना साकारून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले, असे प्रतिपादन सीए अशोक गुर्जर यांनी केले.
समर्थ भारत संस्थेंतर्गत नालंदा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सीएसआरडीच्या मुख्य अधिकारी डॉ. मीरा कुलकर्णी, माधुरी गुर्जर, अपेक्षा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष कर्नल यशवंत बहादुर्गे, उपाध्यक्ष डॉ.
लक्ष्मण काटकर, अमोल चौधरी, प्रिन्सिपल पल्लवी बहादुर्गे, व्यवस्थापक गौतम बहादुर्गे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष कर्नल यशवंत बहादुर्गे म्हणाले, विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची माहिती होण्याच्या उद्देेशाने स्नेहसंमेलनानिमित्त रामायण, महाभारत, सम्राट अशोक, चोला साम्राज्य याबद्दलची पूर्ण माहिती दिली
COMMENTS