अहमदनगर । नगर सह्याद्री नगरचा कापड बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यात कोहिनूर वस्त्रदालनाचे मोलाचे योगदान आहे. 87 वर्षांपूर्वी 300...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगरचा कापड बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यात कोहिनूर वस्त्रदालनाचे मोलाचे योगदान आहे. 87 वर्षांपूर्वी 300 स्क्वेअर फूट जागेतून सुरू झालेला कोहिनूरचा प्रवास आता सावेडी रोडवरील 50 हजार स्क्वेअर फूटाच्या भव्यदिव्य प्रशस्त दालनापर्यंत पोहोचला आहे. अश्विन गांधी यांच्या माध्यमातून गांधी परिवाराची चौथी पिढी कोहिनूरला आणखी उंचीवर नेत आहे. कोहिनूरचे नवीन दालन संपूर्ण कुटुंबाला एकाच छताखाली परिपूर्ण वस्त्र खरेदीचा आनंद देणारे आहे. या दालनाने नगर शहराच्या वैभवात भर पडली आहे, असे प्रतिपादन वर्धमान प्लायवूडचे संचालक शैलेश मुनोत यांनी केले.
मॉलमध्ये कोहिनूर वस्त्रदालनाचे नवीन व महाराष्ट्रातील सर्वात मोठे कपड्यांचे शोरुम नुकतेच ग्राहक सेवेत रुजू झाले आहे. या शुभारंभानिमित्त मुनोत यांनी अश्विन गांधी यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रोनक मुनोत, योगेश मुनोत, राज मुनोत, रितिक मुनोत उपस्थित होते.
कोहिनूर मॉल मध्ये प्रशस्त दुमजली पार्किंगमुळे ग्राहकांना निवांत वातावरणात परिपूर्ण कपडे खरेदीचा आनंद घेता येणार आहे. नव्या शोरुममध्ये मोठ्यांबरोबरच लहान मुलांच्याही कपड्यांची भरपूर व्हरायटी उपलब्ध झाली आह
COMMENTS