अहमदनगर । नगर सह्याद्री शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येक विदयार्थ्याने एक तरी मैदानी खेळ खेळावा.पुस्तकान सोबत मैदानाशी सुद्धा मैत्री करावी....
शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येक विदयार्थ्याने एक तरी मैदानी खेळ खेळावा.पुस्तकान सोबत मैदानाशी सुद्धा मैत्री करावी. खेळा मुळे एकाग्रता वाढते, शरीर निरोगी राहते खेळा मधिल विजय -पराजय खिळाडू वृतिने स्विकारण्याची तयारी विदयार्थिनी ठेवावी असे प्रतिपादन नरेंद्र फिरोदिया यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषाणात केले.
आशा एज्युकेशन फौंडेशन संचलित जय बजरंग विदयालय, पाईप लाईन रोड, अहमदनगर येथे शालेय अंतर्गत हिवाळी क्रिडा स्पर्धां-सन 2022-23 आयोजन करण्यात आले होते. क्रिडा स्पर्धांचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन अहमदनगर बुध्दिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंत बापट उपस्थित होते. यावेळी आशा एज्युकेशन फाउन्डेशनचे सहसचिव उमेश गांधी, संचालक सदस्य किरण मणियार, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर तसेच जय बजरंग महाविदयालयाच्या प्राचार्या संगिता पाठक, प्राथमिकचे मुख्याध्यापक अमोल क्षिरसागर, मुख्याध्यापिका वर्षा कूसकर, आदि उपस्थित होते.
विभागीय पातळीवर निवड झालेल्या विदयालयाच्या यशस्वी विदयार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी मुलींचे झांज पथक संचलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा टेमकर, राहुल मोरे व मनिषा मोरे यांनी केले.
COMMENTS