मुलगी १२वीची विद्यार्थिनी असून ही घटना घडली तेव्हा ती शाळेत जात होती. आरोपी दुचाकीवर होता ज्यावर नंबर प्लेट नव्हते.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
दिल्लीतील द्वारका जिल्ह्यात बुधवारी एका मुलाने एका मुलीवर ऍसिड फेकले. ही घटना ९ वाजता उघडकीस आली असून पीडित मुलीवर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, ही मुलगी १२वीची विद्यार्थिनी असून ही घटना घडली तेव्हा ती शाळेत जात होती. आरोपी दुचाकीवर होता ज्यावर नंबर प्लेट नव्हते पण त्यांची ओळख पटली आहे. आरोपी अल्पवयीन आहे की नाही आणि हल्ल्यामागील हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएस मोहन गार्डन परिसरात एका मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याच्या घटनेबाबत सकाळी नऊच्या सुमारास पीसीआर कॉल आला. त्यात म्हटले आहे की, १७ वर्षीय मुलीवर सकाळी ७:३० च्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी ऍसिड सदृश पदार्थाचा वापर करून हल्ला केला. घटनेच्या वेळी पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत होती. बहिणीने त्यांच्या ओळखीच्या दोन लोकांवर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार मुलीची प्रकृती स्थिर आहे. अधिक माहिती डॉक्टरच चांगले सांगू शकतील," असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, द्वारका मोरजवळ एका शाळेतील मुलीवर ऍसिड फेकण्यात आले. पीडितेच्या मदतीसाठी आमची टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. मुलीला न्याय मिळेल. दिल्ली महिला आयोग अनेक वर्षांपासून देशात ऍसिडवर बंदी घालण्यासाठी लढा देत आहे. सरकारांना जाग कधी येणार?
COMMENTS