मुंबई : साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.मात्र यावेळी ती तिच्या कोणत्याही ग्लॅमरस फोटो किंवा व्हि...
मुंबई : साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.मात्र यावेळी ती तिच्या कोणत्याही ग्लॅमरस फोटो किंवा व्हिडिओमुळे चर्चेत आली नाहीये तर, यावेळी ती तिच्या एका वेगळ्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ज्यामध्ये ती एका फॅनला ट्राफिक रुल्स फॉलो न केल्यामुळे ओरडताना दिसत आहे. लवकरच अभिनेत्रीचा वारीसु हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये रश्मिका सध्या व्यस्त आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ऑडिओ चेन्नईमध्ये लाँच करण्यात आला, त्यादरम्यान रश्मिका मंदान्ना देखील उपस्थित होती. या कार्यक्रमानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रश्मिका तिच्या एका चाहत्याला ट्रॅफिक नियम न पाळल्याबद्दल फटकारताना दिसत आहे. २४ डिसेंबर रोजी नेहरू इनडोअर स्टेडियम, चेन्नई येथे ’वारीसू’चा ऑडिओ लॉन्च कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर रश्मिका कारमध्ये बसून हॉटेलकडे निघाली. यादरम्यान काही चाहते तिला फॉलो करत असल्याचं त्याने पाहिलं. रश्मिका तिची कार थांबवते आणि चाहत्याशी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.तिने तिच्या फॅनला जवळ बोलावलं आणि हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल त्याला फटकारले. यानंतर चाहत्याने आता हेल्मेट घालणार असल्याचे सांगताच रश्मिका मंदान्ना तिथून निघून गेली. रश्मिका मंदानाचा हा व्हिडिो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या वागणूकीचं चाहते कौतूक करताना दिसत आहेत.
COMMENTS