मुंबई : नव्वदच्या दशकात माधुरी दीक्षित, रविना टंडन, जुही चावला यांच्याबरोबरीने आणखीन एक प्रसिद्ध अभिनेत्री होती ती म्हणजे आशिकी’ फेम अनु अग...
मुंबई : नव्वदच्या दशकात माधुरी दीक्षित, रविना टंडन, जुही चावला यांच्याबरोबरीने आणखीन एक प्रसिद्ध अभिनेत्री होती ती म्हणजे आशिकी’ फेम अनु अगरवाल. आशिकी’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि रातोरात स्टार बनली. एकामोगाएक चित्रपट तिला मिळत गेले मात्र तिचा अपघात झाला आणि तिचे आयुष्यच बदलेले. बॉलिवूडपासून ती लांब निघून गेली, मात्र अधूनमधून मुलाखतींच्या माध्यमातून ती चर्चेत येत असते. नुकतंच तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दलचे खुलासे केले आहेत. बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत ती असं म्हणाली, माझ्या लैंगिक गरजा कधीच संपल्या आहेत. मला एनजीओमधील मुलांकडून खूप प्रेम मिळालं आहे. माझ्या आयुष्यात प्रेमाची गरज खूप पूर्वी पूर्ण झाली आहे. हे शारीरिक संबंधांबद्दल नाही. ते खूप पूर्वी संपले होते. ते प्रेम नाही. प्रेमाची संकल्पना बदलली आहे. छोट्या छोट्या गोष्टीतही प्रेम मिळतं. मी प्रेम आणि लैंगिकता यांची बरोबरी करत नाही. असा खुलासा तिने केला. अनु अगरवाल मध्यंतरी इंडियन आयडल’ कार्यक्रमामुळे चर्चेत आली होती. या कार्यक्रमात ती उपस्थित असताना तिच्याबरोबर भेदभाव करण्यात आला होता. तिच्याबरोबरीने इतर कलाकारदेखील उपस्थित होते मात्र तिच्याबरोबर दुजाभाव करण्यात आला होता.
COMMENTS