औरंगाबाद / नगर सहयाद्री कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच, अब्दुल सत्तार यांनी याबा...
औरंगाबाद / नगर सहयाद्री
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच, अब्दुल सत्तार यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे.
टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे.मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे.
माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे.मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले.मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही लोकं यात असू शकतात. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही.सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात आहे.
COMMENTS