सुपा | नगर सह्याद्री आमदार नीलेश लंके यांनी रस्त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नीलेश लंके प्रतिष्...
आमदार नीलेश लंके यांनी रस्त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुपा येथे रस्ता रोको आंदोलन केले. त्यात तब्बल ४१ कार्यकर्त्यांवर सुपा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार नीलेश लंके उपोषणाला बसले होते. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुपा चौकामध्ये नगर पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात म्हटले आहे की निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन साठे यांनी रस्ता रोको बाबत पत्र प्रसिद्ध केले. व त्या अनुषंगाने सुपा चौकात जमले. त्यावेळी गाडी क्रमांक एम एच बारा पी यू १४ ५० यावरून अनाधिकृतपणे लाऊड स्पीकर लावून कार्यकर्त्यांना चौकात रस्ता रोको करण्याकरता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सतीश भालेकर, बाबाजी तरटे, राजू शिंदे यांनी माईक द्वारे लोकांना व कार्यकर्त्यांना जमवले सकाळी ११ ते ११:१० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांचा रस्ता अडविला. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे आदेशा चे उल्लंघन केले. याबाबत फिर्याद सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक यशवंत भानुदास ठोंबरे यांनी दिली आहे. यात सचिन गुलाब पठारे, कारभारी भाऊसाहेब पोटघन, सागर रमेश रोकडे, आकाश शांतीलाल पठारे, राजू नामदेव रोकडे, लोकेश अनिल पठारे, दिलीप नगरे, सचिन गोरख रासकर, जगदीश पोपट साठे, युवराज चंदर साठे, उत्तम अनंतराव पठारे, बाळासाहेब काशिनाथ शिंदे, अतुल गेनू दळवी, संदीप वसंत साठे, पोपट मोकाते, सतीश मोहन भालेकर, किशोर भास्कर थोरात, विजय सदाशिव औटी, भूषण शेलार, सचिन अनिल साठे, जितेश सरडे, अमित जाधव, अमोल पवार, शरद आबा पवार, राजू सखाराम शिंदे, बाबाजी तरटे, बाळू वसंत दळवी, फिरोज गुलाब हवालदार, बाजीराव आनंदा दुधाडे, सचिन भास्कर पवार, विजू दिवटे, किशोर नामदेव यादव, अक्षय थोरात, भाऊसाहेब भोगाडे, संदीप चौधरी, शाहरुख शेख, दीपक आनंदा पवार, विजय नगरे, प्रकाश गुंड, सचिन काळे, भाऊसाहेब सोंडकर आदींसह दहा ते बारा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
प्रशासनावर राजकीय दबाव
चौकट- सामाजिक विषयासंदर्भात रस्त्यावर यावे लागत असेल व त्यासाठी अशा प्रकारे गुन्हे दाखल होत असतील तर हे दुर्दैव आहे. प्रशासनावर राजकीय दबाव असल्याने असे गुन्हे दाखल झाले आहेत. सामान्य जनतेसाठी असे गुन्हे दाखल होत असतील तर प्रतिष्ठानचा कोणताही कार्यकर्ता डगमगणार नाही.
-कारभारी पोटघन, सचिव निलेश लंके प्रतिष्ठान.
शांततेच्या मार्गाने आंदोलन तरी गुन्हे दाखलआमदार नीलेश लंके हे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महात्मा गांधींनी शिकवलेल्या शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन केले. मात्र तरीही आंदोलकांवर अशाप्रकारे गुन्हे दाखल होत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने सहकार्य केले, त्याबाबत त्यांचे धन्यवाद.- सतीश भालेकर, कार्यकर्ते निलेश लंके प्रतिष्ठान
COMMENTS