नवीन विद्युत पंप कार्यान्वित झाल्याने पाणी पुरवठा: सभापती योगेश मते पारनेर । नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायत अंतर्गत येणारा संभाजीनगर सह पर...
पारनेर । नगर सह्याद्री
पारनेर नगरपंचायत अंतर्गत येणारा संभाजीनगर सह परिसरातील पाणीपुरवठा नविन विद्युत पंप कार्यान्वित झाल्याने संभाजीनगर परीसरात सुरळीत झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी दिली आहे.
या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने पारनेर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे हंगा जलाशय पुर्ण क्षमतेने भरुन गेले आहे. पण मागील काही महिन्यात शहरात पाणी पुरवठा करण्यात काही तांत्रिक अडचण आल्याने शहराला वितरित करण्यात येणारा पिण्याचा पाण्याचा पुरवठा नियमीत झाला नव्हता.
शहराला पाणीपुरवठा करणार्या विद्युत पंप नादुरुस्त असल्याने पाणी पुरवठा करण्यास विलंब लागल्याचा सविस्तर खुलासा सोशल मीडियावर नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी केला होता. शहरातील नागरीकांना विद्युत पंप येत्या चार पाच दिवसात कार्यान्वित केला जाईल असा शब्द दिला होता. दिलेला शब्द कर्तव्यदक्ष पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी खरा करून दाखविला. तीन दिवसातच नगराध्यक्ष व ठेकेदार यांच्या सहकार्याने नविन विद्युत पंप कार्यान्वित केला. त्या बद्दल नागरीकांनीं नगर पंचायतचे आभार मानले आहेत.
पारनेर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हंगा जलाशयातून केला जातो. शहरातील कॉलेज जवळील पाणी साठवण टाकीत साठवले जाते. तसेच डॉ. सय्यद यांचा घरामागील टाकीत पण सोडले जाते. त्या नंतर तेथून नळद्वारे वितरण केले जाते. संभाजीनगर, राहुलनगर, लोणी रोड, जामगाव रोड, या परीसरात नळा द्वारे वितरित केले जाते. सुरवातीला काही दिवसापासून एकाच विद्युत पंपावर शहरातील पुरवठा चालु होता. त्यामुळे हा पंप वारंवार नादुरूस्त होत होता. तो पंप दुरुस्त होईपर्यंत आठ दहा दिवस विलंब लागत असायचा.
त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्या पासून वंचित राहावे लागत असे. नागरिकांच्या मुलभूत सुविधाचा प्रश्न दैनिक वर्तमान पत्रातून व सोशल मीडियावर सडेतोड मांडल्याने नगर पंचायत व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती, नगरसेवक यांनी तातडीने विद्युत पंप कार्यान्वित करून शहरातील पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरळीत केला. व कर्तव्यदक्ष सभापती योगेश मते यांनी सोशल मीडिया द्वारे नविन विद्युत पंप कार्यान्वित केला जाईल असा शब्द दिला होता.
चार पाच दिवसात नवीन पंप कार्यान्वित केला जाईल. त्या प्रमाणे पाणी पुरवठा करणार्या विहरीवर नवीन विद्युत पंप बसविला व कार्यान्वित केला. पुरवठा करणारा पंप वारंवार नादुरूस्त होत होता. पण आता स्टँड बाय एक नवीन विद्युत पंप उपलब्ध केला आहे. व पाणी पुरवठा नियमीत सुरू झाल्याने पारनेर शहरातील नागरीक नगर पंचायतचे आभार मानत आहेत.
नवीन विद्युत पंपासाठी पदाधिकारी तळ ठोकून
विद्युत पंप कार्यान्वित करत असताना नगरध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर पाणी पुरवठा सभापती योगेश मते, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, युवा उदोजक सुभाष शिंदे, नगरसेवक भूषण शेलार, मुजाहीद सय्यद, विलास सोबले, कर्मचारी रतन सोनवणे आदी तळ ठोकुन उपस्थित होते
COMMENTS