मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळल्याने शिंदे सरकारवर षंढ अशी टीका करणाऱ्या संजय राऊत यांना सडेतोड उत्तर देण्...
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळल्याने शिंदे सरकारवर षंढ अशी टीका करणाऱ्या संजय राऊत यांना सडेतोड उत्तर देण्यात आलंय. राऊत यांनी वापरलेल्या या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. संजय राऊत तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. तुम्हाला बाहेरचं वातावरण सूट होत नाहीत, अशा शब्दात शंभूराज देसाईंनी राऊत यांना इशारा दिला आहे. पत्रचाळ जमीन घोटाळा प्रकरणी कथित आरोपांखाली राऊत यांना कोठडी झाली असून ते जामीनावर बाहेर आले आहेत.
राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, ‘ षंढ हा शब्द संजय राऊत यांनी हा शब्द वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्याला १५ दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स आलं होतं. ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस संजय राऊतांकडे नाही. न्यायालयाचं कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. ते केवढे मोठे षंढ आहेत.साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत आराम करायची वेळ येऊ नये,अशी वक्तव्य टाळावीत, असा इशारा शंभूराज देसाईंनी राऊत यांना दिला आहे
शिंदे साहेबांनी कर्नाटकच्या प्रश्नावर कधी लाठ्या-काठ्या खाल्ल्या का? असं विचारला जातोय. भुजबळ यांच्या नेतृत्वात जी तुकडी बेळगावात गेली होती, तेव्हा ४० दिवस एकनाथ शिंदे जेलमध्ये होते.. हे शिंदे यांनी सर्वांना सांगितलं आहे, त्यामुळे संजय राऊत यांना यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही, असं शंभूराज देसाई यांनी सुनावलं
COMMENTS