निघोज । नगर सह्याद्री वाढदिवस निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविल्यास त्याचा फायदा सर्व सामान्य घटकांना होतो. यासाठी आपला गणपती गणेश मंडळाचे स...
आपला गणपती गणेश मंडळाचे सचिव रोहित पठारे यांच्या वाढदिवस निमित्ताने संदीप पाटील वराळ, जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व उपस्थीतांच्या हस्ते जिल्हा परिषद मराठी शाळा, अंगणवाडी शाळा व उर्दू शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख बाबाजी तनपुरे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, युवा नेते यश लोढा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान पदाधिकारी सतिष साळवे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, निलेश घोडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संभाजी खोसे शिक्षक काळे सर, मगर सर, उर्दू शाळा मुख्याध्यापिका शबाना बागवान, अंगणवाडी सेविका बेबीताई सोनवणे, लंके ताई, भास्कर सोनवणे, आपला गणपती गणेश मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, अशोकराव लंके, आकाश वराळ, मंडळाचे उपाध्यक्ष महेश ठाणगे, सदस्य विशाल जाधव, गणेश हरेल, मंगेश सोनवणे, संकेत लाळगे, यश लोढा, भाऊ लंके, साहिल वाजे, सचिन खंडू लंके, ऋषीकेश लंके, संदीप लंके, सचिन राजू लंके, कृष्णा निघोजकर, सोहेल मोमीन आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रोहित पठारे यांचा वाढदिवस निमित्ताने संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ,आपला गणपती गणेश मंडळ यांच्या वतीने संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रवि रणसिंग यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.
COMMENTS