चार पाच दिवसात नवीन पंप कार्यान्वित करणार पारनेर । नगर सह्याद्री गेल्या काही दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे सुपा रोड, कॉलेज रोड, लोणी रो...
चार पाच दिवसात नवीन पंप कार्यान्वित करणार
पारनेर । नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे सुपा रोड, कॉलेज रोड, लोणी रोड, राहुल नगर, जामगाव रोड वरील नागरीकांना मागील काही महिन्यात पाणी पुरवठा नियमित होत नाही. त्यामुळे चार पाच दिवसात नवीन पंप कार्यान्वित करण्याचे आश्वासन पारनेर नगरपंचायतीचे पाणी पुरवठा समिती सभापती योगेश मते यांनी नगर सह्याद्री बोलताना सांगितले आहे.
20 डिसेंबर 2022रोजी मी व पाणी पुरवठा समिती मधील सहकारी सदस्यांनी गेल्या दहा महिन्यांत पंपावर झालेला खर्च हा नवीन पंपाच्या किमती इतका होत असल्याने निदर्शनास आणून देउन समिती मधील सभापती सह इतर सदस्यांनी राजीनामा देण्याची आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्याधिकारी यांनी दि.2सप्टेंबर 2022रोजी नवीन पंप खरेदी साठी काढलेला कार्यदेश दि.20डिसेंबर 2022 रोजी संबधित कंत्राटदारास दिला असल्याची माहिती सभापती योगेश मते यांनी दिली आहे.
पारनेर नगरपंचायत मध्ये फेब्रुवारी 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष प्रणित सत्ता नव्याने स्थापन झाली. शहराचा पाणी पुरवठा सभापती पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी विस्कळीत अवस्थेत होता. म्हणून पहिल्याच सर्व साधारण सभेमध्ये प्राध्यान्य क्रमाने विषय क्रमांक 56 ने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नव्याने पंप खरेदी करण्यासाठी सर्वांनमते ठराव मंजूर करण्यात आला. तदनंतर सदर नवीन पंप खरेदी साठी विचारणा केली असता प्रशासना कडून वार्षिक कंत्राटदार नेमलेला नाही असे उत्तर देण्यात आले. मे महिन्यात शेवटच्या हप्त्यात हंगा तलावावर चालु असलेला पंप नादुरूस्त झाला. वार्षिक कंत्राटदार नेमला नसला कारणाने व पारनेर नगर पंचायतच्या फंडांमध्ये खड खडखडाट असल्यामुळे पंप दुरुस्तीचा सर्व खर्च सत्ताधारी नगर सेवकांनी कर्तव्य म्हणून स्वखर्चाने केला. व पंप दुरुस्त करून घेतला. त्या नंतर वार्षिक कंत्राटदाराची नेमणूक ऑगस्ट 22 मध्ये करण्यात आली. नेमणूक झाल्यानंतर नवीन पंप विषयी पाठ पुरावा केला असता नगर पंचायत फंडा मध्ये फंड शिल्लक नसल्याने कारण देण्यात आले. सतत पाठ पुरवठा केल्या नंतर 2सप्टेंबर 22रोजी नवीन पंप खरेदी बाबत कार्यादेश काढण्यात आला. परंतु कार्यादेश संबधित कंत्राटदारास देण्यात आला नाही. दि.19डिसेंबर 2022 रोजी चालु असलेला पंप पुन्हा एकदा नादुरूस्त झाला. नवीन पंप येत्या चार ते पाच दिवसात बसवून तो कार्यान्वित केला जाईल. एक पंप नादुरूस्त झाल्यास दुसर्या पंपाने पाणी पुरवठा नियमित होइल असे आश्वासन पाणी पुरवठा समिती सभापती योगेश अशोक मते यांनी दिले आहे.
COMMENTS