निघोज । नगर सह्याद्री समाजपरिवर्तनाची खरी ताकद युवकांमध्ये असून चांगले विषय घेऊन समाजप्रबोधन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्यात...
निघोज । नगर सह्याद्री
समाजपरिवर्तनाची खरी ताकद युवकांमध्ये असून चांगले विषय घेऊन समाजप्रबोधन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी केले.
पारनेर तालुक्यातील पानोली येथे सी. टी. बोरा महाविदयालय संचलित शिरुर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात युवक राष्ट्राची संपत्ती या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे वक्ते शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांचे व्याख्यान झाले.
शिबिराचे उदघाटन महाविदयालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, मंडळाचे सदस्य धर्मचंद फुलफगर, शिरूर मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या हस्ते झाले. प्रा. कवाद म्हणाले, युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते राष्ट्रउभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील. युवकांनी यश संपादन करण्यासाठी महापुरुषांच्या विचाराचे अनुकरण गरजेचे आहे.
स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्त्वज्ञान जगासमोर मांडले. भगतसिंगांनी भारतमातेला स्वतंत्र्य करण्यासाठी बलिदान दिले. हा आदर्श, भारतीय संस्कृती जपणे गरजेचे आहे. कार्यक्रम अधिकारी डॉ ब्रिजेश तांबे, डॉ. सिद्धार्थ कांबळे, प्रा. मंजुषा पाटील, प्रा. दिलीप टोणगे, डॉ. समाधान बोरसे, प्रा.संतोष खोडदे, जिल्हा दुध संघाचे संचालक दादाभाऊ वारे, माजी सरपंच शिवाजी शिंदे, उपसरपंच प्रशांत साळवे आदी मान्यवर उपस्थिती होते.
COMMENTS