पारनेर, नगर, नेवासा, राहुरी, पाथर्डी, शेवगाव तालुयातील ग्रामस्थांचे ‘करो् या मरो’ आंदोलन अहमदनगर / नगर सह्याद्री- गेल्या तीन वर्षापासून मनम...
पारनेर, नगर, नेवासा, राहुरी, पाथर्डी, शेवगाव तालुयातील ग्रामस्थांचे ‘करो् या मरो’ आंदोलन
अहमदनगर / नगर सह्याद्री-
गेल्या तीन वर्षापासून मनमाड, पाथर्डी व सोलापूर या तीनही महत्वाच्या राष्ट्रीय मार्गाची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या तीन प्रमुख महामार्गावरील रस्ते दुरुस्तीसाठी आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून उपोषण सुरु केले.
या आंदोलनात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, सभापती नरेंद्र घुले, माजी सभापती बाळासाहेब हराळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, दादा कळमकर, विक्रम राठोड, बाबासाहेब भिटे, सचिन गवारे, अॅड. श्याम असावा, धनराज गाडे, राजेंद्र दौड, किसन चव्हाण, रेणुका ताई पुंड, अॅड. हरिहर गर्जे, शिवशंकर राजळे, सतीश पालवे, बा. ठ. झावरे, रा. या. औटी, जितेश सरडे, सतीश भालेकर, अनिल गंधाक्ते, सरपंच सचिन पठारे, सुरेश लगड, सचिन साठे, संदीप मगर, सचिन काळे, दादा दळवी, किशोर थोरात, संतोष तरटे, अक्षय थोरात, कारभारी पोटघन, बाळासाहेब खिलारी, सुधीर लाकुडझोडे, भाऊ निवडुंगे, संदिप वाघमारे, संदीप शिंदे, हर्षल करमकर, प्रसाद पवार, राजेंद्र दौंड, सिताराम बोरुडे, रामराव चव्हाण, गहिनीनाथ शिरसाट, कृष्णा धायतडक, अर्जुन धायतडक, नंदू मुंडे, कृष्णा ढोरकुले, अशपाक पठाण, तुफैल मतानी, संतोष जाधव, सिद्धार्थ घोरपडे, शेखर बांधले, अनिल मोरे, कृष्णा सातपुते, गिताराम जगदाळे, अमोल उगले, आकाश जाधव, समर जाधव, शहानवाज कुरेशी, वैजयंता मते, दिपाली औटी, रवींद्र राजदेव यांच्यासह पाथर्डी, शेवगाव, नेवासा, पारनेर नगर मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड, पाथर्डी व सोलापूर या तीनही महत्वाच्या राष्ट्रीय मार्गाची गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरीक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार वर्ग त्रस्त झाली आहे. वारंवार सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांना या तीनही रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने बुधवार ७ डिसेंबरपासून सर्वसामान्य जनता व लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आ. लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे मनमाड, पाथर्डी व सोलापूर या तीनही रस्त्यांच्या कामाबाबत गेल्या दोन अडीच वर्षापासून काम होण्याबाबत पाठपुरावा करत आहे. संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी मात्र याची दखल घेतली नाही ही बाब अतिशय खेदजनक आहे. अहमदनगर-पाथर्डी-नांदेड या निर्मल रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून रखडले आहे. हा रस्ता शेवगाव, पाथर्डी या मुख्यालयांसह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मोहटादेवी, श्री क्षेत्र कानिफनाथ गड, पैठण येथे जाणारा मुख्य रस्ता आहे. या बाबत संबधित विभागाचे अधिकारी गंभीर नसून ते या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत.
मनमाड रस्ता राहुरी, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता ही तालुके अहमदनगरशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. तसेच सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव, कर्जत, करमाळा, राशीन, टेंभूर्णी असा पुणे-सोलापूर रस्त्यास मिळतो. उत्तर महाराष्ट्रातील, खानदेश, मराठवाड्यातील वारीला जाणारे जाणारे भाविक या रस्त्याच्या पालखी मार्गाने पंढरपूरकडे जातात. शिवाय या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकही सुरू असते. यामुळे होणार्या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत आजपर्यंत कोणीही गांभीर्यपूर्वक दखल घेतलेली नाही. याबाबत सर्वसामान्य नागरिक रोज माझ्याकडे याबाबत तक्रारी करत आहेत. सामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधी या नात्याने काहीच कार्यवाही करू शकलो नाही याची मला खंत वाटते, असेही आ. लंके म्हणाले. स्थानिक लोकप्रतिनीधींना मग्रूर अधिकारी टोलवा टोलवीची उत्तरे देतात. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
उपोषणास आप-मनसे, वंचितचा पाठिंबा
कल्याण निर्मल रस्त्याच्या कामासाठी आ. नीलेश लंके यांच्या आंदोलनाला पाथर्डी तालुयातील मनसे, आपने पाठिंबा दिला आहे. या मार्गाचे काम व्हावे म्हणून आमच्यासह अनेकांनी अनेकदा आंदोलने केली. तरीही काम झाले नाही. सोमवारपासून या मार्गाचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. त्यामुळे लंके यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहोत, असे मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड् व वंचित बहुजन आघाडी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
COMMENTS