अहमदनगर । नगर सह्याद्री नगरकर ग्राहक हा अतिशय चोखंदळ आणि गुणवत्तेला महत्व देणारा आहे. सोन्याच्या अलंकारांची खरेदी करताना तर उत्कृष्ट डिझाईन...
नगरकर ग्राहक हा अतिशय चोखंदळ आणि गुणवत्तेला महत्व देणारा आहे. सोन्याच्या अलंकारांची खरेदी करताना तर उत्कृष्ट डिझाईन, विश्वासार्हता पाहिली जाते. नगरमध्ये होत असलेले गहना लक्झुरी ज्वेलर्स प्रदर्शन नगरकरांसाठी अस्सल अलंकार खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. पुण्यातील प्रतिष्ठित ओसवाल ज्वेलर्स ब्रॅण्ड नगरकरांसाठी येथे प्रदर्शन भरवत आहेत. नगरकरांचाही खास खरेदीसाठीचा लांब अंतरावर जाण्याचा वेळ वाचत आहे, असे प्रतिपादन सौ. सविता रमेश फिरोदिया यांनी केले.
नगरमध्ये गहना लक्झुरी ज्वेलरी एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन हॉटेल आयरिस येथे फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी सी. ए. रमेश फिरोदिया, पवन ओसवाल, धर्मेशभाई आदी उपस्थित होते.
सविता रमेश फिरोदिया पुढे म्हणाल्या की, महिला वर्ग दागिने खरेदीबाबत अतिशय चोखंदळ असतो. आता इंटरनेटमुळे जगभरातील प्रचलित फॅशन, ट्रेंड घरबसल्या पहायला मिळतात. या प्रदर्शनात असे ट्रेंड असलेल्या सुंदर दागिन्यांची मोठी रेलचेल आहे. त्यामुळे प्रत्येकाला अतिशय निवांत वातावरणात दागिने खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.पवन ओसवाल यांनी स्वागत करताना सांगितले की, आगामी लग्नसराई तसेच खास क्षणांना संस्मरणीय करणार्या दागिन्यांची मोठी व्हरायटी या प्रदर्शनात आहे. यात वधूसाठीचे खास डिझाईनचे मंगळसूत्र, नेेकलेस, विविध प्रकारचे हार, अंगठी, कर्णफुले, पायल असे सर्व काही आहे. याशिवाय महिलांचे सौंदर्य खुलवणारे खास डिझाईन, नाजूक कलाकुसर असलेले दागिनेही पहायला मिळणार आहेत. ओसवाल ज्वेलर्स पंधरा वर्षांपासून पुण्यात सुंदर डिझाईनचे 100 टक्के शुध्द हॉलमार्क दागिने ग्राहकांना देत आहे.
अँटीक ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, फॅन्सी मालाचे कलात्मक अलंकार या दालनाचे वैशिष्ट्ये आहे. पुण्यात ओसवाल ज्वेलर्सच्या कस्तुरे चौक तसेच सोमवार पेठेत शाखा आहेत. उत्तम दर्जा ही ओळख असलेल्या ओसवाल ज्वेलर्सच्या माध्यमातून नगरमध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात दागिन्यांची व्हरायटी सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. जास्तीत जास्त नगरकरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मनाप्रमाणे दागिने खरेदी करावी, असे आवाहन ओसवाल यांनी केले आहेसदर प्रदर्शन सोमवार दि. 12 डिसेंबर पर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 यावेळेत सर्वांसाठी खुले आहे. धर्मेशभाई यांनी आभार मानले.
COMMENTS