शहरातील खड्डे मुक्त रस्त्यांसाठी इतके कोटी तर सावेडी बसस्थानका बाबत हा झाला निर्णय अहमदनगर | नगर सह्याद्री खा. सुजय विखे पाटील यांनी आज मुं...
शहरातील खड्डे मुक्त रस्त्यांसाठी इतके कोटी तर सावेडी बसस्थानका बाबत हा झाला निर्णय
अहमदनगर | नगर सह्याद्री
खा. सुजय विखे पाटील यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.यावेळी अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्यासाठी महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी २५ कोटी रुपये आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या सावेडी बस स्टँडच्या नूतनीकरणासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचे निवेदन दिले.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच अहमदनगर शहराच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. याप्रसंगी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब देखील उपस्थित होते.
COMMENTS