अहमदनगर । नगर सह्याद्री भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी भिंगार शहर व परिसरात तीन ठिकाणी सुरू असलेल्या बिंगो जुगारावर छापे टाकून कारवाई केल...
अहमदनगर । नगर सह्याद्री
भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी भिंगार शहर व परिसरात तीन ठिकाणी सुरू असलेल्या बिंगो जुगारावर छापे टाकून कारवाई केली. या प्रकरणी तीन स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गवळीवाडा येथे पाण्याच्या टाकीजवळ बिंगो जुगार खेळविणार्या आकाश चंद्रकांत घोरपडे (वय 28, रा. सदर बाजार, भिंगार) यांच्यावर दुपारी दीड वाजता कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी एलईडी, रोख रक्कम असा 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोना भानुदास गौतम खेडकर यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकाँ व्ही. आर. गारूडकर तपास करत आहेत.
याच ठिकाणी रवी शंकर परदेशी (वय 41, गवळीवाडा, भिंगार) याच्यावरही सायंकाळी साडेपाच वाजता कारवाई करण्यात आली. एलईडी, रोख रक्कम व लॅपटॉप असा 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोना राहुल तात्यासाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पी.ए. बारगजे हे करत आहेत.
COMMENTS