निघोज । नगर सह्याद्री लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, ...
निघोज । नगर सह्याद्री
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व स्वर्गीय प्रसाद सोनवणे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले.
रक्तदान श्रेष्ठ दान असून कोरोना काळात उद्भवलेली परिस्थिती सर्वांनी जवळून पाहिली आहे. तसेच महिला आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला भाग म्हणजे हिमोग्लोबिन. आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिर प्रसंगी 40 बॅग्स रक्त संकलित करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन युवती व महिला कर्मचारी यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले, सरपंच म्हाळू गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, संजय गायकवाड, शोभाताई सोनवणे, दीपक सोनवणे आदींबरोबरच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. वसुंधरा पाटील, डॉ. प्रवीण पवार, जनसंपर्क अधिकारी भारत वर्पे, डॉ. मुक्ता बिडवे, डॉ. जयश्री माळवे, डॉ. तन्मय खेंडके, डॉ. चंद्रप्रकाश गुप्ता, डॉ. स्वीटी पोखर, डॉ. श्रेयांस चौधरी सह महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी अमित शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमित शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगिता तळेकर व अश्विनी आहेर यांनी तर आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गणेश शेळके यांनी मानले. शिबिरामध्ये महाविद्यालयीन युवक युवतींनी तसेच आश्वी पंचक्रोशीतील युवक - युवतींनी सहभाग नोंदविला होता
COMMENTS